Maharashtra Government Public Holiday List 2024 : सरकारी विभागामध्ये असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे, तुम्ही जर पुढील वर्षी Holidays Plan करत असाल तर नक्कीच सार्वजनिक सुट्ट्या कधी? व किती? मिळणार आहे, यानुसार तुम्ही तुमच्या ट्रिपचे नियोजन करू शकता, इथे तुम्हाला महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतीच अधिसूचना काढून सार्वजनिक सुट्ट्या (Public Holiday List 2024) जाहीर केल्या आहेत, पुढील वर्षीच्या म्हणजेच सन 2024 मधील सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादी सविस्तर पाहूया..
कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! पुढील वर्षात (2024) मध्ये तब्बल 129 सुट्ट्या मिळणार, सुट्ट्यांची यादी जाहीर, पहा संपूर्ण यादी
पुढील वर्षात कर्मचाऱ्यांना तब्बल 129 सुट्ट्या मिळणार आहे. बऱ्याचदा सण/उत्सव जवळ आले की, त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी आहे का? असा सर्वसामान्य प्रश्न आपल्याला पडतो, मात्र आता तुम्हाला संपूर्ण वर्षातील अधिकृत सुट्ट्यांची यादी (Public Holiday List 2024) मिळणार आहे. त्याचा फायदा तुम्हाला बस, रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी किंवा इतर नियोजन करण्यासाठी नक्कीच कामी येणार आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ या वर्षातील एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केलेल्या आहे. याबाबतची अधिसूचना दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ रोजी काढण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक सुट्ट्या 2024 | Maharashtra Government Public Holiday List 2024
सन २०२४ मधील सार्वजनिक सुट्यांची यादी खालीलप्रमाणे
महाराष्ट्र शासनाने दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्टया म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
सण/उत्सव - दिनांक- वार
- प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी (शुक्रवार)
- छत्रपती शिवाजी महाराज जंयती १९ फेब्रुवारी (सोमवार)
- महाशिवरात्री ८ मार्च (शुक्रवार)
- होळी (दुसरा दिवस) २५ मार्च (सोमवार)
- गुड फ्रायडे २९ मार्च (शुक्रवार)
- गुढीपाडवा ९ एप्रिल (मंगळवार)
- रमझान ईद ११ एप्रिल (गुरुवार)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल (रविवार)
- रामनवमी १७ एप्रिल (बुधवार)
- महावीर जयंती २१ एप्रिल (रविवार)
- महाराष्ट्र दिन १ मे (बुधवार)
- बुद्ध पौर्णिमा १ मे (गुरुवार)
- बकरी ईद (ईद उल झुआ) १७ जून (सोमवार)
- मोहरम १७ जुलै (बुधवार)
- स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट (गुरुवार)
- पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १५ ऑगस्ट (गुरुवार)
- गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर (शनिवार)
- ईद-ए-मिलाद १६ सप्टेंबर (सोमवार)
- महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर (बुधवार)
- दसरा १२ ऑक्टोबर (शनिवार)
- दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १ नोव्हेंबर (शुक्रवार)
- दिवाळी (बलिप्रतिपदा) २ नोव्हेंबर (शनिवार)
- गुरुनानक जयंती १५ नोव्हेंबर (शुक्रवार)
- ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवार (बुधवार)
राज्य शासनाने अजून एक 3 नोव्हेंबर रोजी अतिरिक्त सुट्टी राज्य शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी जाहीर केली आहे. अधिसूचनेनुसार दिनांक 3 नोव्हेंबर 2024 रोजी भाऊबीज निमित्त सुट्टी मिळणार आहे.
केवळ बँकासाठी
खालील सुट्टी बँकांसाठी मर्यादित आहे. सदरहू सुट्टी शासकीय कार्यालयांसाठी लागू नाही.
बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी १ एप्रिल, २०२४, सोमवार रोजी सुट्टी असणार आहे.
पुढील वर्षात (2024) मध्ये तब्बल 129 सुट्ट्या मिळणार
सन २०२४ या वर्षात एकूण ५२ रविवार आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्या अशा एकूण ७६ सुट्ट्या आहेत. आणि ज्या शासकीय कार्यालयांना ५ दिवसाचा आठवडा लागू आहे, अशा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तब्बल १२९ सुट्ट्या मिळणार आहे. यामध्ये ५२ रविवार आणि ५२ शनिवार (दोन शनिवारच्या सुट्ट्या ह्या सार्वजनिक सुट्यात पकडलेले आहे.), २४ सार्वजनिक सुट्ट्या, आणि 1 अतिरिक्त शासकीय कार्यालयांसाठी सुट्टी अशा एकूण तब्बल १२९ सुट्ट्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.