राज्यातील सर्व शाळांमध्ये वाचन चळवळ उपक्रम, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

School Education News : आनंददायी वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन, युनिसेफ व रिड इंडिया यांच्या संयुक्त भागीदारीत " महाराष्ट्रातील वाचन चळवळ" हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेकडून वरील संदर्भीय पत्रान्यये शासनास प्रस्ताव प्राप्त झाला आहे. सदर प्रस्तावास अनुसरुन राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

राज्यातील सर्व शाळांमध्ये वाचन चळवळ उपक्रम, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

School Education News

व्यक्ती उन्नतीला, समाज विकासाला, राष्ट्र उत्कर्षाला वाचन आवश्यक आहे, वाचन हे एक महत्त्वाचे मूलभूत कौशल्य आहे. वाचन संज्ञानात्मक विकासाला चालना देते. पुढील आयुष्याच्या शैक्षणिक यशाचा अंदाज लावते. 

बोलली जाणारी भाषा मुले नैसर्गिकरित्या शिकतात, पण बाचन जाणीवपूर्वक शिकले पाहिजे, मुले सामान्यतः इयत्ता २ री पर्यंत वाचायला शिकतात, परंतु National Achievement Survey (NAS)- २०२१ राज्य अहवाल सूचित करतो की, इयत्ता ३ री मधील ३०% पेक्षा जास्त मुले राज्यात लहान मजकूर वाचू शकत नाहीत.

इयत्ता ५ वी पर्यंत ४१% मुले त्यांच्या ग्रेड-स्तरासाठी योग्य मजकूर वाचू शकत नाहीत आणि ८ वी पर्यंत ४३% पर्यंत वाचतात. तथापि, लहानपणापासूनच मुलांना कथा पुस्तके (विशेषतः त्यांच्या मातृभाषेत) वाचनाच्या अनेक संधी उपलब्ध करून देऊन हे चित्र बदलू शकते, २०२० पासून, राज्य शासन "गोष्टींचा शनिवार" या वाचन मोहिमेद्वारे आणि अलीकडेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उर्दू वाचन कार्यक्रमाद्वारे प्राथमिक शाळेतील मुलांमध्ये वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी युनिसेफसोबत काम करत आहे.

वाचन चळवळ उद्देश

सन २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील इयत्ता ३ री पर्यंतचे प्रत्येक मूल समजपूर्वक ओघवते वाचन करु लागेल, इयत्ता ८ वी मधील प्रत्येक मुल "शिकण्यासाठी वाचू शकेल असे सुनिश्चित करणारी आनंददायी वाचनाची लोक चळवळ निर्माण करण्याचा उद्देश आहे.

वाचन चळवळ राबविणारे सहभागी घटक

  1. शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य 
  2. UNICEF 
  3. रीड इंडिया
  4. प्रथम बुक्स

चळवळीची उद्दिष्टे

  • वाचनाचे महत्त्व सांगणे आणि इयत्ता ३ री पर्यंत प्रत्येक मुलाला वाचन कौशल्य प्राप्त करुन घेणे व वाचायला शिकविणे.
  • मुलांना वाचनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभागातुन कार्यक्रमाला प्रसिद्धी देऊन एक लोक चळवळ उभी करणे.
  • वाचनाची आवड मुलांमध्ये रुजविण्यासोबतच वयोगटानुसार मुलांना मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करुन देणे व त्याद्वारे मराठी भाषेचा नवीन वाचक वर्ग तयार करण्यास मदत करणे,
  • वाचनाद्वारे मुलांवर चांगले संस्कार घडवणे.
  • कथा, कविता, कादंबरी, नाटके, ज्यातून रसग्रहण दृष्टी प्राप्त होते. यातून मुलांमध्ये रसास्वाद घेण्याची वृत्ती निर्माण करणे
  • मुलांमध्ये नैतिक मुल्यांची रुजवण करणे.

उपक्रमाची रुपरेषा

राज्यस्तरीय वाचन चळवळीचा शुभारंभ - मा. मुख्यमंत्री, मा. उप मुख्यमंत्री तसेच मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे हस्ते महाराष्ट्रातील वाचन चळवळीचा अधिकृत शुभारंभ होईल. शुभारंभाच्या कार्यक्रमात निवडक मुलांचे कथाकथन आणि कथा वाचन, वाचन चळवळीची ओळख करुन देणारा लघु चित्रपट व मान्यवरांचे मार्गदर्शन इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. त्यानंतर जिल्हास्तरीय वाचन चळवळीचा शुभारंभ होईल.

वाचन संस्कृतीचा महायज्ञ - या कार्यक्रमाद्वारे वाचन चळवळीला वाचन संस्कृतीचा महायज्ञ असे रुप दिले जाईल. यामध्ये प्रत्येक आठवडयात एक विषय / थीम निश्चित करुन त्यावर आधारित पुस्तकांचे शाळांमध्ये वाचन करणे, वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा इ. चे आयोजन करणे, मुलांना यासंदर्भात १ ते २ मिनिटाचे व्हिडीओ करून ते सुयोग्य साईटवर अपलोड करण्यास प्रोत्साहीत करणे, त्याबाबतची स्पर्धा व पारितोषिके (पुस्तक स्वरुपात) प्रदान करणे.

शाळांचा सहभाग राज्यातील सर्व शासनमान्य व खाजगी शाळांचा या उपक्रमांमध्ये सहभाग असेल. (खाजगी शाळांना पुस्तके अनुज्ञेय होणार नाहीत) वर्षभरात ठराविक तारखा निश्चित करुन या तारखांना प्रत्येक शाळेत वाचनाचे खास वर्ग / कार्यक्रम आयोजित केले जातील. यामध्ये विद्यार्थी पुस्तकांची देवाणघेवाण करतील.
Post a Comment (0)
Previous Post Next Post