RTE Admission Process Started : अखेर राज्यातील आरटीईच्या 25% प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, ही प्रवेश प्रक्रिया आता यापूर्वीच्या नियमानुसार होणार असून, राज्यातील खाजगी शाळेत 25% जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. जिल्हानिहाय शाळा, रिक्त जागांची आकडेवारी...
राज्यातील 9138 शाळेत 1 लाख 2 हजार 434 बालकांना मोफत प्रवेश
याबद्दलची राज्यातील जिल्हानिहाय RTE च्या शाळा व रिक्त जागांची आकडेवारी आरटीई पोर्टलवर जाहीर करण्यात आली आहे. आरटीई पोर्टलवर जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आता 9 हजार 138 शाळेत 1 लाख 2 हजार 434 बालकांना मोफत प्रवेश मिळणार आहे.
$ads={1}
Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 नुसार राज्यातील खाजगी शाळेत वंचित व दुर्बल गटातील बालकांसाठी नवीन प्रवेशाच्या 25% राखीव जागा ठेवण्याची तरतूद आहे. मात्र यंदा या नियमामध्ये दि. ९ फेब्रुवारीच्या अधिसूचनेनुसार मोठे बदल करण्यात आले होते, मात्र या अधिसुचनेविरूद्ध मा. उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका तसेच इतर संलग्न रिट याचिका दाखल झालेल्या असून, आता मा. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता RTE ची प्रवेश प्रक्रिया नव्याने राबविण्यात येत आहे.
आरटीईच्या जिल्हानिहाय शाळा, रिक्त जागांची आकडेवारी जाहीर
आरटीई पोर्टलवर जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यामध्ये RTE च्या सर्वाधिक 915 शाळा असून, या शाळांमध्ये 15 हजार 606 बालकांना प्रवेश देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्याखालोखाल नागपूर जिल्ह्यात 654 शाळेत 6918 रिक्त जागा तर ठाणे जिल्ह्यात 639 शाळेत 11309 रिक्त जागा, संभाजीनगर (औरंगाबाद) 573 शाळेत 4441 रिक्त जागा, नाशिक 428 शाळा 5272 रिक्त जागा, पालघर 265 शाळेत 4773 रिक्त जागा, मुंबई 255 शाळेत 4489 रिक्त जागा असणार आहे.